
अहमदनगर (दि.९ जानेवारी):-निंबळक रेल्वेगेट दि.११ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे.

डबल रेल्वेलाईनच्या कामकाजामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना इजा पोहचू नये अपघात होऊ नये त्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व निंबळक,इसळक,खारेकर्जूने,नागापूर या ग्रामपंचायतींनाही तसे पत्र दिले आहे.