
अहमदनगर (१८ जानेवारी):-नगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या संपुर्णा सावंत यांची माझा परिवार महाराष्ट्र राज्य महिला ग्रुपच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.आपल्या सामाजिक कार्यातून नगर शहरातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये कामाचा ठसा ऊमठावणाऱ्या व महिलांसाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या सौ.संपुर्णा सावंत यांच्या निवडीने नगर शहरात महिलावर्गांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.माझा परिवार महाराष्ट्र राज्य महिला ग्रुपचे श्री.राहुल भापकर यांनी सावंत यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.