पुणे (प्रतीनिधी):-शिक्षक भरती नसल्यामुळे गरिब विद्यार्थी कुठे शिकतील आणि याच कारणामुळे राष्ट्र अधोगती कडे जाऊन अन्न वस्त्र निवारा याच्या शोधात लोक फिरतील.
अशी संकल्पना ठेवून आदिमानव वेशभूषा करून शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना भविष्याचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने या अनोख्या आंदोलनातून केला आहे.
हे आंदोलन दि.१८ जानेवारी रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सेंट्रल बिल्डिंग येथे करण्यात आले.या प्रकारचे आंदोलन करण्याचे कारण असे की,2010 पासून शिक्षक भरती झाली नाही व 2017 ला शिक्षक भरती झाली परंतु काही लोकांना अजूनही नियुक्ती पत्र मिळालेले नाही,2024 मध्ये शिक्षक भरती होणार परंतु माध्यमाच्या आधारावर गुणवत्तेच्या आधारावर नाही अशी अरेरावी सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका आप ने घेतली आहे.शैक्षणिक क्षेत्राकडे झालेले सरकारचे दुर्लक्ष तसेच संपण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळा ज्यात तुम्ही आणि मी आणि अनेक जण शिकून मोठे झाले आहेत.शिक्षक भरतीत 2010 पासून सतत झालेला हलगर्जीपणा व त्यातून निर्माण झालेल्या एक शिक्षकी शाळा,आणि या शाळांविषयी निर्माण झालेली पालकांची उदासीनता या कारणांमुळे समाजातील काही घटक शिक्षणापासून वंचित होत जाईल यात दुमत नाही.
आणि अशाच प्रकारे शिक्षक नाहीत म्हणून शाळा बंद पडतील व मोठ्या प्रमाणात बेरोजगार शिक्षक समाजात फिरताना दिसतील.यातून निष्पन्न असे होईल की,राष्ट्र अधोगती कडे जाईल व आपण सर्व फक्त मूलभूत गरजांच्या शोधात (अन्न,वस्त्र,निवारा) म्हणजेच आदिमानवाप्रमाणे जगण्यास लाचार होऊ.हा भविष्याचा विचार करत त्याचे चित्र आज आम आदमी पक्षाच्या आंदोलनातून दिसत आहे.
शिक्षकच नसेल तर समाज कसा घडेल? मातृभाषाच नसेल तर आकलन कसे असेल? आणि आकलन नसेल तर मानव कसा तरेल? सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील एक घटक नेहमीच शिक्षणा पासून वंचित राहिल व अशिक्षित म्हणून ओळखला जाईल.
या सर्व मागण्यांसाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शितल कांडेलकर शहराध्यक्ष शिक्षक आघाडी पुणे शहर,यांच्या नेतृत्वाखाली महासचिव अक्षय शिंदे,सतीश यादव,प्रवक्ते धनंजय बेनकर,महिला अध्यक्ष सुरेखा भोसले,पूजा वाघमारे शहर उपाध्यक्षा,निरंजन अडागळे,किरण कद्रे,अमोल काळे,संजय कोने,शाहीन आत्तार,अंजली इंगळे,श्रद्धा शेट्टी,अनिश वर्गीस,मनोज थोरात, प्रशांत कांबळे,रामभाऊ इंगळे, मिलिंद सरोदे,संतोष काळे,अविनाश केंदळे,रवींद्र पाडाळे,ज्ञानेश्वर गायकवाड,संजय कटारनवरे, हरीश चौधरी,खुशबू अन्सारी,बळीराम शहाणे,कुमार धोंगडे,बापू रगसिंग,उत्तम वडवराव,सुरज सोनवणे,अभिजीत गायकवाड इ.उपस्थित होते.