
अहमदनगर (दि.१८ जानेवारी):-जिल्हापरिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाभरात जलजीवन मिशन योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.या योजना निकष डावलून केल्या जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी केला होता.
याप्रकरणी पाठपुरावाही केला होता,परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करत गुरूवारी दि.१८ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी हातात दांडा घेऊन दालनात प्रवेश केला.पाणीपुरवठा विभाग कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर,त्यांनी विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांचे दालन फोडले.यावेळी पोटे म्हणाले की,नगर तालुक्यातील कोल्हेवाडी,भातोडी व हातवळण या तीनही गावांत झालेल्या योजना निकष डावलून केल्या आहेत.
या लाईन पुन्हा टाकण्याची मागणी करून दुर्लक्ष केले जाते,तीन महिन्यांपासून पाठपुरावा केला असताना,अधिकारी पाच ते सहा दिवस फोन घेत नाही.आठ दिवसांत फेरसर्वेक्षण करून लाईन टाकल्या नाही तर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन फोडण्याचा इशारा देत, कार्यालयातच ठिय्या मांडला. जिल्हापरिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरात १ हजार ३०० कोटींच्या पाणी योजनांची कामे सुरू आहेत.
नगर तालुक्यातील पाणी योजनांची पाईपलाईन ३ फूट खोदण्याऐवजी दिड फूट खोदल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हापरिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय फोडले.कार्यालयात काचांचा खच पडला होता,घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी पंचनामा केला व प्रकाश पोटे यांना ताब्यात घेतले.ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश भिंगारदिवे,तन्वीर शेख,अभय कदम,रियाज इनामदार,अविनाश वाकचौरे,सोमनाथ राऊत,संदिप थोरात दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली.