अहमदनगर (दि.२० जानेवारी):-संगमनेर तालुक्यातील चिंचेवाडी, साकुर येथील वृध्दाच्या डोक्यात दगड घालुन निघृणपणे खुन करणाऱ्या 2 सराईत आरोपीना 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्री.बाळु देवराम खेमनर (रा.हनुमान मंदीरा जवळ,चिंचेवाडी, साकुर,ता.संगमनेर) यांचे वडील मयत देवराम मुक्ता खेमनर हे मलिबाबा मंदीर, चिंचेवाडी येथे झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालुन कोणीतरी अनोळखी इसमाने जिवे ठार मारले बाबत घारगांव पो.स्टे.गु.र.नं.12/24 भादविक 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.हि घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना सदर ना उघड खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने लागलीच घटना ठिकाणी आजु बाजूस राहणारे लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,आरोपी नामे नामदेव सोन्नर व सुरेश कोकरे दोन्ही रा.साकुर,ता. संगमनेर यांनी खुन केला असुन ते चिंचेवाडी डोंगरामध्ये लपुन बसलेले आहेत,आता गेल्यास मिळुन येतील अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.
पथकाने तात्काळ चिंचेवाडी परिसरातील डोंगरात जावुन बातमीतील संशयीतांचा शोध घेत असतांना 2 इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले.त्यांचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी मयत देवराम खेमनर हे दि17 जानेवारी 2024 रोजी मलिबाबा मंदीर, चिंचेवाडी येथे झोपलेले असताना दारु पिण्यासाठी त्यांचे खिशातील पैसे काढुन, त्यांचे डोक्यात दगड टाकुन खुन केल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपींकडे सखोल व बारकाईने तपास केला असता आरोपी नामे नामदेव रंगनाथ सोन्नर हा घारगांव पो.स्टे.गु.र.नं. 549/2023 भादविक 379,34 या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला, श्रीमती.स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/अतुल लोटके,दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल,देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,संतोष खैरे,विजय ठोंबरे,फुरकान शेख,पोकॉ/रणजीत जाधव, आकाश काळे,बाळासाहेब गुंजाळ,प्रमोद जाधव,अमृत आढाव,किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड व चासफौ/चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.