अहमदनगर (दि.१९ जानेवारी):-राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत मोपेड गाडीवर गावठी कट्टा व गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन तरुणांना जेरबंद करण्यात राहुरी पोलीसांना यश आले आहे.ही कारवाई १९ जानेवारी रोजी पोलिसांनी केली आहे.
राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अज्ञात इसम देसी पिस्टल विक्री करता घेऊन येणार आहे.या प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कारवाई करण्यासाठी एक पोलीस पथक तयार केले.व कारवाई करता रवाना केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने सापळा रचला असता काळ्या रंगाची मोपेड गाडी क्रमांक MH.16. DH.5613 या गाडीवर जॉन कॅसिनो परेरा,अब्दुल वाहद सय्यद शाबिर रा.अहमदनगर हे देशी बनावटीचे पिस्टल 3 काडतुस सह व सोबतच गाडीचे डिक्की मध्ये लपवलेल्या 1440 gm गांजा मिळून आल्याने एकूण 10,4000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून NDPS कायद्यान्वये (CHANCE Raid) व Arms Act कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर मॅडम , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सूरज गायकवाड,पोलीस हवालदार राहुल यादव,पोलीस हवालदार विकास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे,पोलीस नाईक प्रवीण अहिरे,पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम,पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे यांनी केली आहे.