गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे तब्बल ७० वर्षापासून रखडलेल्या मागासवर्गीय वस्तीतील पुलासाठी मिळणार निधी;मा.फुले डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंचाच्या पाठपुराव्यास यश
संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता ओढ्याला पाणी आल्यामुळे नेहमी पाण्यात जातो.पावसाळ्यात रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर सहा ते सात महिने ओढ्याल पाणी असते.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीसह इतर मागासवर्गीय वस्त्यांकडे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होतो.इतर कोणताच पर्यायी मार्ग नसल्याने शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती,आजारी पेशंट तसेच नागरिकांचे येण्या-जाण्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मा.फुले डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच या संस्थेने याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे हिवरगाव पावसा येथील रस्ते व पुलासाठी निधीची मागणी केली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीसाठी उंच पुलाचा प्रस्तव मंजुरीसाठी तयार करण्याची आदेश दिले.हिवरगाव पावसा ते देवगड देवस्थान रस्त्यावरील पूल,उंबरवाडी रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालया जवळचा पूल तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा अमरधाम जवळचा रस्ता पाण्याखाली जातो.सदरच्या रस्त्याने ये-जा करणे धोकादायक बनते, मा.फुले डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागासवर्गीय वाड्यावस्त्यांकडे जाणारे रस्त्यांना डांबरीकरण,खडीकरण,सिमेंट पाईप टाकण्याकरिता व उंच पुलासाठी निधीची मागणी केली.
सदर निवेदनाची दाखल घेत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी उप अभियंता,सार्वजनिक बांधकाम उपविभाग,पं.स.संगमनेर यांना आदेश दिले.परंतु दीर्घकाळ कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची भेट घेतली. पावसाळ्यात शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती,आजारी पेशंट तसेच नागरिकांचे येण्या-जाण्याचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी कार्यतत्पर्ता दाखवत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीसाठी उंच पुलाचा प्रस्तव मंजुरीसाठी तात्काळ तयार करण्याचे आदेश संबंधित पदाधिकार्यांना दिले.
त्यानुसार ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांनी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजने अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीसाठी उंच पुलासाठी निधी मंजुरी करिता तातडीने प्रस्ताव तयार केला आहे. गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या कार्यतत्परतेमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीतील उंच पुलाचा ७० वर्षांचा प्रश्न सुटणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीसाठी उंच पुलाला निधी मिळणे कमी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव,माजी भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,ग्रामसेवक हरिष गडाख,विलास कदम,गणेश दवंगे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा.नितीनचंद्र भालेराव यांनी दिली.