अहमदनगर (दि.२० जानेवारी):-पुणे येथे गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करणारे ७ सराईत गुन्हेगार केडगाव परीसरातून कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे.
दि.२० जानेवारी कोतवाली पोलीस निरिक्षक श्री.प्रताप दराडे साहेब गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,वाकड पोलीस स्टेशन,पुणे येथे गाडयांची तोड-फोड करुन पोलीस स्टेशनच्या हददीत दहशत निर्माण करुन सराईत गुन्हेगार हे केडगाव येथील अंबिका हॉटेल येथे आलेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणी जावून कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने तपास पथकाती पोलीस अंमलदार यांनी अंबिका हॉटेल केडगाव अहमदनगर येथे जावून खात्री केली असता त्यांना सदर ठिकाणी ७ इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले असता त्याच्या कडे विचारपुस करुन त्याना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सुरुवातील उडवा उडवीची उत्तरे दिली,
त्यांनंतर त्यांना विश्वासात घेतले असता त्यांनी त्याचे नावे १)गणेश बबन खारे मुळ रा हेळंब ता.देवणी जि.लातुर,ह.रा.पडवळनगर, थोरगाव,पुणे २) कैवल्य दिनेश जाधवर रा.शहर पो.स्टे पाठीमागे अंबाजोगाई जि.बीड ३) ऋषीकेश हरी आटोळे रा. पवानगर लेन नं-३ पडवळनगर,थोरगाव पुणे ४) सुमित सिद्राम माणे रा. शिवराज नगर लेन नं.२ राहटणी पुणे (५) प्रितम सुनिल भोसले रा.आदर्शनगर काळेवाडी पुणे ६)विराज विनय शिंदे रा.जयभवानी महिला मंडळ मागे जनता वसाहत पर्वती पुणे ७)रोहित मोहन खताळ रा.दगडु पाटील नगर लेन नंबर ३ थेरगाव पुणे असे असल्याचे सांगितल्याने वाकड पोलीस स्टेशन,पुणे येथे माहिती देवून गुन्हयाच्या पुढील चौकशी कामी आरोपींना ताब्यात दिले.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकरी नगर शहर विभाग श्री.हरीष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, पोहेकॉ/शाहीद शेख,पोहेकॉ/रविंद्र टकले,पोहेकॉ/राहुल शिंदे,पोहेकॉ/योगेश कवाष्टे, पोना/सलीम शेख,पोकॉ/दिपक रोहकले,पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/सुरज कदम, पोकॉ/सत्यजित शिदे,पोकॉ/महेश पवार,पोकॉ/शिवाजी मोरे,पोकॉ/प्रमोद लहारे, पोकॉ/लोळगे यांनी केली आहे.