अहमदनगर (दि.२० जानेवारी):-तोफखाना पोलीसांनी गॅस रिफीलींग सेटरवर छापा टाकुन तब्बल ४१ गॅस टाक्या केल्या जप्त,
दि.२० जानेवारी रोजी नालेगाव येथील पर्जन्यश्वर मंदिराजवळ,दातरंगे मळा येथे एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला मनोज कोंडके या नावाचा इसम बेकायदेशीर रित्या शासनाचा कोणताही परवाना नसतांना गॅस कंपनीच्या घरगुती व कमर्शीअल गॅस टाक्या जवळ बाळगून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतुन गॅस काढुन तो एल.पी.जी वाहनामध्ये अनधिकृतरित्या रिप्लींग करीत आहे,अशी बातमी तोफखाना पोलिसांना मिळाल्याने या ठिकाणी छापा टाकुन कोंडके याचे कब्जातुन 2,29,000/- रु.किंमतीच्या एकुण ४१ गॅस टाक्या त्यामध्ये भारत गॅस,हिंदुस्थान गॅस कंपनीच्या घरगुती व व्यापारी वापराच्या गॅस टाक्या व एक Laxmi नावाची तीन एच.पी इलेक्ट्रिक मोटर त्यास गॅस रिप्लींग करीता लावलेले मशिन व त्यास दोन पाईप त्याचे तोंडाला नोझल जोडलेले जप्त करण्यात आले.
तोफखाना पोस्टे येथे गुरनं 82/2024 भा.दं.वि.कलम 285,286,336 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1995चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोहेकॉ/गायकवाड या करत आहेत.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री .हरीष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि.श्री/आनंद कोकरे,पोउपनि/सचिन रणशेवरे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट, पोहेकॉ/दिनेश मोरे,पोहेकॉ/ पोना/भानुदास खेडकर,पोना/संदिप धामणे,पोना/वसीम पठाण,पोहेकॉ/अहमद इनामदार,पोहेकॉ/सुधीर खाडे,पोकॉ/सतीष त्रिभुवन, पोकॉ/सतीष भवर,पोकॉ/ दत्तात्रय कोतकर,पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/सुमीत गवळी,पोकॉ/भापसे यांनी केली आहे.