Maharashtra247

युवकांचा ध्यास….एच.आय. व्ही.संपवण्याची आस;मांजरसुंबा येथे विशेष श्रम संस्कार शिबिर व मोफत सर्व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अहमदनगर (दि.२१ जानेवारी):-जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रेड रिबन क्लब राधाबाई काळे महिला महाविद्यालय, एकात्मिक सल्ला समुपदेशन केंद्र,संपूर्ण सुरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरसुंबा गावामध्ये आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिर,मोफत सर्व आरोग्य तपासणी शिबिरात ९० ते १०० युवकांची मोफत तपासणी व मोफत समुपदेशन करण्यात आले.

यावेळी डॉ.निकाळजे, रा.का.म.म चे उपप्राचार्य सुरेश कदम सामाजिक अधिष्ठान जिल्हा रुग्णालय, डॉ.अडसरे सर,डॉ.अंबेकर मॅडम,डॉ.ठुबे मॅडम,श्री. पाठक सर,श्रीमती पाटील मॅडम,शर्मिला कदम समुपदेशक,वाळू इदे समुपदेशक,सागर फुलारी संपूर्ण सुरक्षा केंद्र व्यवस्थापक,वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख संपुर्ण सुरक्षा केंद्र,शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरा वेळी शर्मिला कदम बोलताना म्हणल्या की, युवा वर्गांनी आरोग्याकडे लक्ष देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे त्याच बरोबर युवा वर्गामध्ये एचआयव्हीचे प्रमाण जास्त असल्याने रेड रिबीन क्लबच्या माध्यमातून कॉलेज व महाविद्यालयात एचआयव्ही बाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे त्या हेतूने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत विविध महाविद्यालयात रेड रिबीन क्लब आयोजित केले जातात यातून समाजाला एच.आय.व्ही/एड्स बाबत माहिती हवी व समाजामध्ये जनजागृती घडून यावी.या वर मार्गदर्शन केले.शिबिराप्रसंगी बोलताना सागर फुलारी यांनी आरोग्य सेवा,HIV,गुप्तरोग एच आय व्ही व एड्स यातील फरक त्याच बरोबर संपूर्ण सुरक्षा केंद्र मार्फत आरोग्य विषयक सामाजिक संरक्षण विषय योजनांची माहिती तसेच गरजेनुसार विविध सेवा केंद्र संदर्भ करणे तपासणी व उपचार करता सेवा केंद्राशी जोडणी करून देणे संपूर्ण सुरक्षा केंद्रामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देत युवकांनी युवकांसाठी चालवलेली चळवळ (RRC) यावर माहिती दिली.

इतर तपासणी बरोबर एच.आय.व्ही. तपासणी करून आपली स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे,यावर मार्गदर्शन केले.शिबिरात रेड रिबन क्लब मार्फत विविध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले.यावेळी रुग्णांशी बोलताना संपूर्ण सुरक्षा केंद्र वाळू इदे,वैशाली कुलकर्णी, अरबाज शेख यांनी रुग्णांना आरोग्य व तपासणी बाबत समुपदेशन केले.तसेच एच.आय.व्ही. ची तपासणी आपण दर तीन महिन्याला करणे गरजेचे आहे.काही संदर्भित सेवा लागत असेल तर जिल्हा रूग्णालय संपूर्ण सुरक्षा केंद्र ओपीडी ४४ ला भेट देऊन सेवा घ्यावी या माहिती दिली.तसेच रक्त तपासणी बाबत कोणकोणत्या चाचण्या केल्या जातील तसेच तपासण्या का करून घ्याव्या आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित तपासण्या करणे का गरजेचे याबाबत अरबाज शेख यांनी माहिती दिली.

तर नाव नोंदणी वैशाली कुलकर्णी यांनी करून रुग्णांची बीपी चेक अप दरम्यान प्राथमिक माहिती घेतली.एकूण शिबिरांत ८८ युवकांनी रक्ताच्या विविध चाचण्या केल्या.थायरॉईड, उच्च रक्तदाब,मधुमेह,लिव्हर विकार,वजन,उंची कावीळ, फुफुसाचे विकार,दमा निमोनिया,संसर्गजन्य आजार डेंगू,मलेरिया,एच.आय.व्ही, गुप्तरोग,किडनीचे टेस्ट, कॅन्सर सिरम कॅल्शियम, शुगर,हिमोग्लोबिन,इत्यादी मोफत रक्त तपासणी केल्या गेल्या.शिबिर यशस्वी ते साठी राधाबाई काळे महिला महाविद्यालय यांनी परिश्रम घेतले तर डॉ.निकाळजे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

You cannot copy content of this page