Maharashtra247

प्रभू श्रीरामा चरणी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य..विखे परिवाराच्या माध्यमातून दिलेल्या साखर आणि डाळीतून २१ लाख लाडूंचा नैवद्य दाखवला जाणार..

नगर (प्रतिनिधी):-येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात भव्यदिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.या निमित्ताने देशभर दिवाळी सारख्या सणाचा माहोल असणार असून नगर जिल्ह्यातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने असणारा उत्साह केवळ मोठाच नव्हे तर विश्वविक्रमी होणार असे दिसून येत आहे.

या दिवशी नगर जिल्ह्यात थोडे-नी-थिडके तब्बल 21 लाख लाडू श्रीराम चरणी नैवद्य म्हणून अर्पिले जाणार आहेत.भाजपसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, धार्मिक संघटना, संस्थांच्या वतीने जिल्ह्यातील राम मंदिर तसेच हनुमान आदी देवी-देवतांची मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली असून ,भगव्या पताकां, सडा-रांगोळ्यानी सजवली जाणार आहेत. अनेकांनी महाआरती, महाप्रसाद, भजन-कीर्तन यांचे आयोजन तर राम-सीता वेशभूषा, रांगोळी स्पर्धा असे विविधावीत कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले असून घराघरात दिवे-पणत्या, आकाश कंदील, रांगोळी, गोडधोड जेवण करून दीपावली सणा सारखा हा दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

याच अनुषंगाने नगर दक्षिणेचे भाजप खासदार सुजय विखे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मतदारसंघातील गावोगावी 22 जानेवारीला लाडू बनवण्याच्या उद्देशाने साखर-डाळ शिदा वाटप केले आहे. घराघरात या शिदयातून बनवलेल्या लाडवातून दोन लाडू परिसरातील श्रीराम, हनुमान मंदिरात प्रसाद म्हणून मूर्तिपूढे ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. या एकूण उपक्रमासाठी साखर शिदा वाटपा पासून ते 22 जानेवारीला ठिकठिकाणच्या मंदिरात उत्सव साजरा करत श्रीरामाच्या लाडू नैवेद्य कार्यक्रमासाठी खा.सुजय विखे यांचे कार्यकर्ते-यंत्रणा जिल्हाभर काम करत आहे.

जिल्ह्यात विशेषतः खा.सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता पर्यंत 400 पेक्षा अधिक गावांत मोफत साखर-डाळ वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले असून प्रत्यके कार्यक्रमाला स्वतः खा.सुजय विखे यांची आवर्जून उपस्थिती राहिली आहे. त्यांनी या कार्यक्रमातून साखर-शिदा वाटपाचा उद्देश सांगताना 22 जानेवारीला न चुकता दिलेल्या शिदयातून बनवलेले दोन लाडू जवळच्या श्रीराम अथवा हनुमान आदी मंदिरात नैवेद्य स्वरूपात ठेवण्याचे आवर्जून आवाहन केले आहे.

आता पर्यंत जिल्ह्यात पार पडलेले 400 च्यावर कार्यक्रम पाहता शेकडो टन साखर आणि डाळ नागरिकांना मोफत वाटण्यात आली आहे. यातून प्रत्येक घरातून केवळ दोन नैवेद्य म्हणून येणाऱ्या लाडवांची संख्या 21 लाखावर असणार आहे. त्यामुळे एकीकडे अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत असताना नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा नैवेद्य श्रीराम चरणी चढवला जाणार आहे. एकाच वेळी श्रीरामाला 21 लाख लाडूंचा नैवेद्य ही अभुतपुर्व घटना असणार असून हा एक प्रकारे जागतिक विक्रमी नैवेद्य असणार आहे.

You cannot copy content of this page