
अहमदनगर (दि.२५ जानेवारी):-सावेडी उपनगरातील पवननगर येथील मार्क कन्ट्रक्शनचे बांधकाम चालू असून घटनेतील फिर्यादी यांनी साइटवर दिवसभर काम करून घरी गेले असता,त्यांनी या बांधकामावर स्लॅब टाकला असुन यातील सेंट्रींगचे प्लेटा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहे.
असे त्यांच्या निदर्शनात आले त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेऊन गुन्हा दाखल केला. तोफखाना पोलिसांनी तपास करत 1)रोहीत विष्णु शिंदे 2) शंकर मारुती शिंदे 3)सागर शंकर शिंदे रा.पवननगर या तिघांना अटक केले.त्यांच्या कडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या 15,000/- रु.किंमतीच्या 30 स्टिलच्या प्लेटा व 25,000/- रु.किंमतीची स्प्लेंडर मोटार एकुण 40,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल तोफखाना पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हयाचा पूढील तपास पोहेकॉ/सुधीर क्षिरसागर हे करत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. हरीष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील पो.नि.श्री/ आनंद कोकरे,पोउपनि/सचिन रणशेवरे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पाहेकॉ/सुनिल शिरसाट, पोहेकॉ/दिनेश मोरे,पोहेकॉ/ भानुदास खेडकर,पोना/पोना संदिप धामणे,पोना/वसीम पठाण,पोहेकॉ/अहमद इनामदार,पोहेकॉ/सुधीर खाडे,पोकॉ/सतीष त्रिभुवन, पोकॉ/दत्तात्रय कोतकर, पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/ सुमीत गवळी यांनी केली आहे.