अहमदनगर (दि.२९ जानेवारी):-तक्रारदार- पुरुष वय- 42,रा कोल्हार बुद्रुक, ता- राहाता,जि.अहमदनगर
आरोपी – १)अशोक श्रीपती गायकवाड,वय 52 वर्ष, वजन मापे निरीक्षक वर्ग-2,नेमणूक-वजन मापे कार्यालय,श्रीरामपूर,जि.अहमदनगर रा-जिजामाता चौक,स्टेट बँकेजवळ श्रीरामपूर,जि.अहमदनगर
लाचेची मागणी-12,000/ -₹
तडजोडी अंती-10,000/-₹
लाच स्विकारली – 10,000/- ₹
लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक – 29/1/2024
लाचेचे कारण -तक्रारदार हे मा.राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था,प्रवरानगर चे मॅनेजर असून सदर संस्थेच्या वतीने भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पम्प चालविला जात आहे,
सदर पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी यातील आलोसे गायकवाड,वजन मापे निरीक्षक,कार्यालय श्रीरामपूर हे 12,000/-₹ लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे आज दिनांक 29/01/2024 रोजी प्राप्त झाली होती,सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक 29/01/2024 रोजी प्रवरानगर येथील संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पेट्रोल पंप येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष 12,000/-₹ लाच मागणी करुन तडजोडीअंती 10,000/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,त्यानुसार आज रोजी प्रवरानगर येथील सदर संस्थेच्या पंपावर लोकसेवक गायकवाड यांचे विरुद्ध सापळा लावण्यात आला असता सदर सापळा कारवाई दरम्यान आलोसे गायकवाड यांनी यातील तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष 10,000/-₹लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ सापळा अधिकारी:-प्रवीण लोखंडे,
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र. वि. अहमदनगर
मो.न.7972547202