अहमदनगर (दि.२९ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दांपत्याचा खून करणाऱ्या पाचव्या आरोपीस अटक करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे.
राहुरी पोलीस स्टेशन येथील गुन्हा नंबर 75/2024 मध्ये वकील दांपत्यास कोर्टातून पळून नेऊन त्यांचा खून करून विहिरीत टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी चार आरोपी 27 जानेवारी 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले होते.
फरार पाचवा आरोपी कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे, राहणार उंबरे याच्या बाबतीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना त्याच्या ठावठिकाणा बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे तपास पथक व वांबोरी बीटचे पथकाने त्यास तात्काळ अटक केली.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सूचनेनसार पोउपनी/चारुदत्त खोंडे,पोहेकॉ/पारधी,पोकॉ/ अंकुश भोसले,पोकॉ/सतीश कुराडे,पोहेकॉ/विकास साळवे,पोहेकॉ/अशोक शिंदे,पोना/नागरगोजे,पोकॉ/ पाखरे,पोना/बागुल यांनी केली आहे.