अहमदनगर (दि.२८ जानेवारी):-मालवाहु ट्रक चालकाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीसह त्यांच्या दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला.
हि घटना नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडली आहे. मयत कुटुंब पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील आहे. मयतामध्ये आठ महिन्याच्या चिमुकलीचाही मृत्यू झाला आहे.अनिल बाळासाहेब पवार त्यांची पत्नी सोनाली, अनिल पवार,मुलगा माऊली अनिल पवार व आठ महिन्याची मुलगी चिऊ अनिल पवार अशी मयतांची नावे आहेत.दुसर्या दुचाकीला धडक बसून भगवान भिकाजी आव्हाड हे जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह अपघातस्थळी धाव घेतली तसेच उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क केला.अधिक तपास पोलीस करीत आहेत.