Maharashtra247

तलवार जवळ बाळगणा-या तरुणास भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर (दि.२८ जानेवारी):-धारदार तलवार बाळगणा-या तरुणा विरुद्ध कारवाई करत भिंगार कॅम्प पोलीसांनी त्यास जेरबंद केले आहे.हि घटना २८ जानेवारी रोजी घडली आहे.

या बाबत माहिती अशी की भिंगार पोलीस स्टेशनचे सपोनि/ योगेश राजगुरु यांना गोपनिय माहिती मिळाली की मुकुंद नगर येथील इंडिया बेकरीच्या पाठीमागे एक तरुण त्याचे हातात धारदार तलवार अवैधरित्या घेवुन फिरत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने सपोनि/राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदारांनी बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा रचुन सदर इसमास तो पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे हातात असलेली एक धारदार तलवार जागीच जप्त केली असुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अरमान नईम शेख (रा.गजानन कॉलनी, मुकुंदनगर अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले.पोकॉ/कैलास शिरसाट यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरनं 65/2024 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग श्री.हरिष खेडकर उपविभागीय यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु,पोसई/किरण साळुंके,सफो/रेवननाथ दहिफळे,सफो/कैलास सोनार,पोहेकॉ/संदिप घोडके, पोहेकॉ/दिपक शिंदे,पोहेकॉ/ अजय गव्हाणे,पोकॉ/अमोल आव्हाड,पोकॉ/समिर शेख, पोकॉ/कैलास शिरसाठ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page