अहमदनगर (दि.२८ जानेवारी):-शहरातील तीन ठिकाणी गोमांस विक्रेत्यांवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकुन 42 हजार 400/- रु किं.चा मुद्देमाल जप्त केला आहे.हि कारवाई दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास केली आहे.
तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,यांना गुप्त बातमी मिळाली की,कौलारु सर्जेपुरा येथे तीन ठिकाणी वेगवेगळ्या गाळ्यामध्ये गोमांस विक्री चालु आहे अशी गोपनिय बातमी मिळाल्याने पोनी/कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकाने कैलारु सर्जेपुरा येथे तीन ठिकाणी छापा टाकुन इसम नामे तनवीर सत्तार कुरेशी,इम्रान मोहम्मद हानिफ,शाकीर सय्यद हारुन या विक्रेत्यांवर छापा टाकुन त्यांच्या कडुन मुद्देमाल जप्त केला असून त्यात 171 किलो गोमांस,तीन वजनी काटे,गोमांस कापण्यासाठी लागणारे 06 सुरे असा मुद्देमाल एकुण 42,400/- रु किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि.क 269, 188 महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) (क) 9 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.हरिष खेडकर,तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पो.उप.नि./सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाठ,अहमद इनामदार, दिनेश मोरे,भानुदास खेडकर,संदिप धामणे,वसिम पठाण,पोकॉ/सुमित गवळी, सतिष त्रिभुवन,शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर,सतिष भवर, बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.