अहमदनगर (दि.६ फेब्रुवारी):-अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रीस आणलेल्या दोन गावठी कट्ट्यासह एकास तोफखाना पोलीसांनी गंगा उद्यान जवळ केले जेरबंद,
याबाबत समजलेली माहिती अशी की,तोफखाना पोलीस ठाण्याच्या मागे गंगा उदयानापाशी दि.६ फेब्रुवारी रोजी एक तरुण गावठी कट्टे घेऊन विक्री करण्याकरीता येत असल्याची गोपनीय बातमी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली मिळालेल्या माहीतीवरुन पोनि/कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहिती वरील ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले.
पथक सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी करण कृष्णा फसले (रा. खिस्तगल्ली,अहमदनगर) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून ४० हजार रु.किंमतीचे दोन गावठी कट्टे हस्तगत केले.पोहेकॉ/भानुदास खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं १२९/२०२४ आर्म एक्ट कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा झाला आहे.पुढील तपास पोसई/सचिन रणशेवरे करीत आहेत.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आंनद कोकरे यांच्या सूचनेनुसार पोउपनि/सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दिनेश मोरे,पोहेकॉ/भानुदास खेडकर,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोहेकॉ/अहमद इनामदार,पोहेकॉ/सुधीर खाडे,पोना/वसीम पठाण, पोना/संदिप धामणे,पोकॉ/ सुमीत गवळी,पोकॉ/ शिरीष तरटे,पोकॉ/दत्तात्रय कोतकर, पोकॉ/सतीष भवर,पोकॉ/ सतीष त्रिभुवन,पोकॉ/ बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.