Maharashtra247

मिडास कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीनंतर स्वस्तिक नेत्रालय व मॅटर्नीटी रुग्णालयाचे संचालक डॉ.प्रफुल चौधरी व डॉ.कल्याणी चौधरी यांनी केला पत्रकार परिषदेत खुलासा

अहमदनगर:-दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीचा स्वस्तिक नेत्रालय व मॅटर्नीटी रुग्णालयातील आतल्या बाजूस कुठलाही परिणाम जाणवला नसून कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातल्या मिडास टच या कमर्शियल कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली होती.शॉर्टसर्किट मुळे हि आग लागल्याचे सांगण्यात आले अग्नीशामक विभागाने ही आग आटोक्यात सुद्धा आणली दरम्यान याच कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या स्वास्तिक नेत्रालव मॅटर्नीटी हॉस्पिटल मधील रुग्नांना गंभीर दुखापत झाली असल्याच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आल्या होत्या.

परंतु वास्तविक पाहता आग ही नेत्रालयाच्या बाहेरच्या बाजूने लागली होती याचा कुठलाच परिणाम रुग्णालयाच्या आतील बाजूस झालेला नसून रुग्णालयातील सर्व रुग्ण व कर्मचारी पूर्णपने सुखरूप असून सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचा खुलासा स्वस्तिक नेत्रालयाचे संचालक डॉ.प्रफुल चौधरी व डॉ.कल्याणी चौधरी यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

You cannot copy content of this page