आर.पी.आय चे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांचा ७५ वा वाढदिवस उत्साहात साजरा
संगमनेर (नितीन भालेराव):-कोपरगाव शहरात आरपीआयच्या वतीने राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांचा ७५ वा वाढदिवस केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जेसीबी मशीनच्या साह्याने फुलांची उधळण करत,ढोल ताशांचा गजरात,फटक्यांची आतिषबाजी,आणि मंचावर आल्यावर सत्कारासाठी क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालण्यात आला, असे भव्य दिव्य स्वागत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि श्रीकांत भालेराव यांचे स्वागत करण्यात आले.
कोपरगाव शहरात आरपीआयच्या वतीने राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित सामाजिक समता परिषद आणि संविधान सन्मान सोहळ्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सह आरपीआय नेते विजयराव वाकचौरे,जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,प्रकाश लोंढे,पप्पू बन्सोड,हेमंत रणपिसे इ.मान्यवर उपस्थित होते.
आर.पी.आय चे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी आंबेडकर चळवळीत निष्ठेने व प्रामाणिकपणे अनेक दशके काम केले आहे.अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करताना जिल्ह्यात मोठे तरुणांचे संघटन उभे केले.मागासवर्गीय,आदिवासी,महिला,शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलने करून न्याय मिळविण्यासाठी संघर्ष केला.संघर्षशील भीम योद्ध्याच्या निष्ठा,प्रामाणिकपणा व कार्य कर्तुत्वाचे कौतुक करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी श्रीकांत भालेराव यांना वाढदिवसा निमित्त केक भरवून शुभेच्छा दिल्या.
रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधत मोदींच्या कामाचे कौतुक केले. शिर्डी लोकसभेसाठी आपण इच्छुक आहोत.याबाबत भाजपाचे जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा झाली आहे. शिर्डीची जागा भाजपला मिळाल्यास शिर्डीतून निवडणूक लढविण्याची तयारी आहे.याबाबत भाजपा नेत्तुत्वाशी चर्चा करणार असल्याचे आठवले म्हणाले. श्रीकांत भालेराव यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित सामाजिक समता परिषद आणि संविधान सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.