अहमदनगर (दि.७ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दांपत्य आढाव पती-पत्नीच्या हत्येमध्ये नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा हात असल्याची बातमी युट्युब चॅनेल वरून प्रसारित करण्यात आली होती.
मात्र याबाबत आता राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला असून ज्या प्रकरणाचा आणि आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नाही या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी अटक झाले असून खून हा खंडणीच्या कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या प्रकरणातील सर्व सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे.
मात्र एका युट्युब चॅनलच्या माध्यमातून निखिल वागळे नामक पत्रकाराने थेट आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा या खुनामध्ये हात असल्याचा आरोप केल्याने अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात निखिल वागळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.