माता रमाई जयंतीच्या निमित्ताने सावखेड भिई येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन;रमाई नऊ कोटी दिन दुबळ्यांची आई बनली म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने जगत आहोत-बसपा महिला जिल्हाध्यक्षा संघमित्रा कस्तुरे
बुलडाणा (प्रतिनिधी):-देऊळगाव तालुक्यातील सावखेड भीई येथे दि.७ फेब्रुवारी रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पार्टी बुलडाणा महिला जिल्हाध्यक्षा संघमित्रा कस्तुरे या होत्या यावेळी सिंदखेडराजा विधानसभेतील गिरवली गावात संघमित्रा कस्तुरे यांच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.यावेळी संघमित्रा कस्तुरे यांनी रमाईंच्या संपूर्ण जीवनपट सांगितला,व रमाईच्या जिवनावर प्रकाश टाकताना संघमित्रा कस्तुरे म्हणाल्या की रमाई ने जो संघर्ष केला,ज्या मरणप्राय यातना सहन केल्या त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याला पूर्ण करू शकले.
रमाई नऊ कोटी दिन दुबळ्यांची आई बनली म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने जगत आहोत.या कार्यक्रमाला विध्यानंद रोडगे, बहुजन समाज पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते धम्मपाल सरकटे,सिंदखेड राजा प्रभारी हिम्मतराव जाधव यांनीही माता रमाई च्या जिवनावर आपले मत व्यक्त केले.तत्पूर्वी महिलांनी बहुजन समाज पार्टी बुलडाणा महिला जिल्हाध्यक्षा संघमित्रा कस्तुरे यांचे पुष्पहार घालून भव्य स्वागत केले.या कार्यक्रमाला बहुसंख्य महिलांची तसेच पुरूष वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.