Maharashtra247

माढयाचा खासदार निवडून आणण्यासाठी भाजपचे ‘गाव चलो अभियान’ 

सोलापूर (प्रतिनिधी):-माढयाचा खासदार निवडून आणण्यासाठी गाव चलो अभियान यशस्वी करा अभियानाच्या माध्यमातून सरकारने केलेली विकास कामे सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजप माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी आढावा बैठकीत केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करण्यासाठी माढा तालुक्यातील सुपर वॉरियर व पदाधिकाऱ्यांची बैठक टेंभुर्णी येथे संपन्न झाली.

यावेळी माढा विधानसभा प्रमुख आमदार रणजितसिह मोहिते पाटील,लोकसभा प्रभारी राजकुमार नाना पाटील,मंडल अध्यक्ष योगेश बोबडे,जलतज्ञ अनिल पाटील,ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्या माया माने,धनश्रीताई खटके,प्रतिक्षा गोफणे,युवा मोर्चाचे उमेश पाटील,विस्तारक आनंद राऊत,भाजप नेते जयसिंग ढवळे,भारतनाना पाटील , विधानसभा विस्तारक संभाजी वरपे,सुपर वारियरस, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page