
अहमदनगर (दि.१२ फेब्रुवारी):-नेवासा तालुक्यातील तीन सराईत इसम गावठी कट्टे जवळ बाळगताना आढळल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना तात्काळ जेरबंद केले आहे.
लखन भाऊसाहेब आल्हाट,लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे,अविनाश उर्फ देविदास विक्रांत आल्हाट (रा.मोरया चिंचोरे, ता.नेवासा) असे पकडलेल्या तीनही आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.श्री.दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,लखन भाऊसाहेब आल्हाट रा.नेवासा हा त्याच्या साथीदारासह विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आपले कब्जात बाळगुन ते विक्री करण्याचे उद्देशाने भिस्तबाग महालासमोर,सावेडी परिसरामध्ये येणार आहे.
ही बातमी मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी बातमीची हकीगत पोलीस पथकास कळवुन संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्यास सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार भिस्तबाग महाल येथे सापळा लावून थांबले असताना दुचाकीवर तीन संशयित इसम तेथे येऊन थांबले त्यांना विचारपुस केली असता त्यातील दोघे पळून जाऊ लागले पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना शेताफीने पकडले.
त्यांच्या ताब्यातून 30,000/-रुपये किमतीचा गावठी कट्टा, 1000/- रुपये किमतीचे 02 जिवंत काडतुस,व 70,000/- रुपये किमतीची विनानंबरची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल असा 1,01,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं.154/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे तीनही आरोपी सराईत असून यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात, सफौ/भाऊसाहेब काळे, पोना/रविंद्र कर्डीले,भिमराज खर्से,संदीप दरंदले,गणेश भिंगारदे,संतोष खैरे,पोकॉ/ बाळासाहेब गुंजाळ,प्रशांत राठोड,चासफौ/उमांकात गावडे यांनी केली आहे.