
अहमदनगर (दि.१८ फेब्रुवारी):-नगर तालुक्यातील शेंडी गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच प्रयागा लोंढे यांनी गावातील महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी त्यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी सह भा.दं.वि. कलम ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शेंडी गावच्या शिवारात असलेल्या अनुसूचित जाती जमाती समाजाच्या स्मशानभूमीत शुक्रवारी (दि.१६) दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे.शेंडी ग्रामपंचायतच्या वतीने गावात स्मशानभूमीत कचराकुंडी खड्डा घेण्याचे काम सुरु करण्यात आले होते.त्यावेळी हिरा रावसाहेब नेटके,अलका गोरख ससाणे, सुनिता नेटके,काजल ससाणे, शांता नेटके,छाया नेटके (रा. शेंडी,ता.नगर) यांनी विरोध दर्शविला.
त्याचा राग येवून सरपंच प्रयागा लोंढे यांनी त्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.हिरा रावसाहेब नेटके यांनी ही फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा तपास नगर ग्रमीणचे पोलिस उपअधीक्षक संपत भोसले करीत आहेत,