
अहमदनगर (दि.१९ फेब्रुवारी):-शिवजंयती उत्सवानिमीत्त नगर शहरात प्रवेशास मनाई असतानाही शहरात फिरताना आढळुन आल्याने तरुणास कोतवाली पोलीसांनी कारवाई करत अटक केले.
दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवजयंती मिरवणुक चालु असताना कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना अज्ञात नागरीकाने फोनव्दारे संपर्क करुन ईसम नामे महेश सुरेश दळवी (रा.बु-हानगर अहमदनगर) हा त्यास शहरामध्ये प्रवेश करणेस बंदी असतांनाही शहरामध्ये फिरत आहे अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यांचे पथकातील अंमलदार मिळालेली माहिती कळवून आरोपीस ताब्यात घेण्यास सांगितले.
पथकाने तात्काळ मार्केटयार्ड भागात जावुन ताब्यात घेतले घेतले.हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मागदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे सूचनेनुसार पथकातील सफो/राजेंद्र गर्गे पोकॉ/याकुब सय्यद,पोहेकॉ/ ज्ञानेश्वर मोरे व होमगार्ड अजबे यांनी केली आहे.