
अहमदनगर (दि.२० फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात जेऊर पाटोदा शिवारात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची घटना सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
अरुण रतन दाभाडे (रा.टिळेकर वस्ती,येवला रोड,ता.कोपरगाव) असे आरोपी पतीचे नाव आहे.पुजा अरुण दाभाडे असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी मयत पूजा यांचा पती अरुण रतन दाभाडे याला अटक केली आहे.या प्रकरणी मयत पुजा दाभाडे यांचे वडील किरण तुळशीराम पठारे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती अरुण दाभाडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.