Maharashtra247

मशाल घ्या,तुताऱ्या घ्या;नुसती हवा निघेल हे देखील कळेल खासदार सुजय विखेंची ठाकरे-पवारांवर टीका

अहमदनगर (दि.२३ फेब्रुवारी):-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले त्यावर खा.सुजय विखे पाटील आज जिल्हाधिकार्यालयात आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पवार व ठाकरेंवर टीका केली.

कारण तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार म्हणाले लढाई पूर्वी तुतारी वाजवली जाते.आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवू.यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की,मशाली घ्या तुतारी घ्या स्वागत आहे तुमचं मात्र तुतारी वाजेल की,नुसती हवा निघेल हे देखील कळेल.तसेच फार तर फार तुतारी आम्ही तुम्हाला नव्या घेऊन देऊ अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी विखे यांनी केली.

कांदा निर्यात बंदी बाबतच्या निर्णयावरून खासदार सुजय विखे यांच्यावरती टीका टिपण्णी झाली.यावर खासदार सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिले मात्र भाजपचे आमदार राम शिंदे यांनी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून विखे पिता पुत्रांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत जर विखे पिता पुत्रांनी अमित शहा यांची भेट घेतली तरी पण निर्णय का झाला नाही.तसेच भेटीत याबाबत चर्चा झालीच की नाही अशी शंका राम शिंदे यांनी व्यक्त केली होती.यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हटले की,मंत्री समितीचे अध्यक्ष हे अमित शहा असल्या कारणाने तेच हा निर्णय घेऊ शकतात.याबाबत एखाद्याला काही वेगळी भावना असेल तर त्यावर ती मला काही टिप्पणी करायचे नाही अशा शब्दात खासदार सुजय विखे यांनी यांनी आ.प्रा.राम शिंदे यांच्या वरती बोलणे टाळले.खा.विखे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

You cannot copy content of this page