Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त जंगी कुस्त्यांचा हगामा;नामांकित पैलवानांची रंगणार कुस्त्यांची दंगल

संगमनेर (नितीन भालेराव):-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पद्दस्पर्शाने संगमनेर तालुक्यातील पवित्र भूमीत तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवास २३ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.श्री. क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त भव्य स्वरुपाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त राज्यस्तरीय अश्व प्रदर्शन,तसेच जागरण गोंधळाचा कार्यक्रम,कै.पांडुरंग मुळे (मांजरवाडीकर) तमाशा नाट्यमंडळाचा मोफत तमाशाच्या कार्यक्रमा बरोबर जंगी कुस्त्यांचा हगामा आयोजीत आला आहे.जिल्ह्याबाहेरील नामांकित पैहीलवानाच्या उपस्थितीत कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत.हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवास २५ फेब्रुवारी दुपारी ३ ते ५ वाजता जंगी कुस्त्यांचा हगामा आयोजीत करण्यात आला आहे. संगमनेर तालुका तसेच नगर जिल्ह्या बाहेरील नामांकित पैहीलवानाच्या उपस्थितीत रंगणार कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत.विजेत्या पैहीलवानास प्रथम क्रमांकसाठी श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवगड केसरी गदा व श्री.शैलेंद्र दत्तात्रय गाडेकर,सिव्हिल इंजिनियर याचेकडून पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.दुसरे पारितोषिक श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवगड केसरी ट्रॉफी आणि श्री.सिताराम पंजा राऊत,जि.प.सदस्य यांचे कडून तीन हजार शंभर रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

तृतीय पारितोषिक श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवगड मनाचा फेटा आणि श्री.अंकुश जनार्दन नरवडे याचे कडून दोन हजार शंभर रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.यात्रा उत्सवात आयोजीत जंगी कुस्त्यांचा हगामा स्पर्धेत जास्तीत जास्त पैहीलवान कुस्तीगीर यांनी सहभागी होण्यासाठी श्री.गणेश दवंगे मो.९५०३८२२१३९ तर श्री.दशरथ गोसावी सर मो.८६६८६४८५२० यांच्या बरोबर संपर्क साधावा.तसेच आयोजित जंगी कुस्त्यांचा हगामा स्पर्धेत कार्यक्रमाला उपस्थितीत राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत हिवरगाव पावसा व ग्रामस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page