
अहमदनगर (दि.२६ फेब्रुवारी):-नागापुर येथील सह्याद्री चौकात संदीप ऊर्फ बाळु कमलाकर शेळके यास २३ फेब्रुवारी रोजी कोणीतरी अनोळखी व्यक्तीने नायलॉन पट्टीने गळा आवळुन व दगडाने डोके व चेहरा ठेचुन जिवे ठार मारले बाबत एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. 169/2024 भादविक 302, 201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच घटना ठिकाणी आजु बाजूस राहणारे लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना मयत संदीप शेळके हा दि.२१ फेब्रुवारी रोजी विशाल जगताप व साहील पठाण (दोन्ही रा. एमआयडीसी) यांचे सोबत देशी दारुचे दुकानात दारु पित बसलेले होते अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.
पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास दिली व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि/माणिक चौधरी व अंमलदार यांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.स्थागुशा पथकाने लागलीच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन इसम नामे विशाल जगताप व साहील पठाण दोन्ही रा. एमआयडीसी यांचा त्यांचे राहते घरी व आजु बाजूस शोध घेतला असते ते 2 दिवसांपासुन घरी नसल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या विषयी पथकाचा संशय बळावला.स्थागुशा पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास करता संशयीत इसम हे शहागंज मोहल्ला, जिल्हा आग्रा,राज्य उत्तर प्रदेश येथे असले बाबत खात्री झाल्याने पथकाने सदर ठिकाणी जावुन संशयीतांचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.मयातास अनैसर्गिक संभोग करण्याच्या उद्देशाने पाजली दारु,विरोध करताच गळा आवळुन व डोक्यात दगड घालुन खुन केला अशी कबुली आरोपीने दिली.
या दोन्ही आरोपींना आग्रा,उत्तरप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,अंमलदार रविंद्र कर्डीले,विशाल दळवी, भिमराज खर्से,फुरकान शेख, देवेंद्र शेलार,विजय ठोंबरे, सागर ससाणे,आकाश काळे, प्रशांत राठोड,अर्जुन बडे यांनी व एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.