Maharashtra247

तमाशा कलावंत अविष्कार मुळे यांना उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट राज्यस्तरीय पुरस्कार;देवगड खंडोबा यात्रेत झाला सन्मान कला सम्राज्ञी पवळा कलामंचचा पुढाकार   

संगमनेर (नितीन भालेराव):-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पद्दस्पर्शाने पवित्र भूमीत,संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त तमाशा कलावंत अविष्कार मुळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त कै.पांडुरंग मुळे (मांजरवाडीकर) यांच्या सुप्रसिद्ध तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हजेरीच्या कार्यक्रमा दरम्यान कला सम्राज्ञी पवळा कलामंचाच्या वतीने तमाशा कलावंत अविष्कार विवेकानंद मुळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.अविष्कार मुळे यांनी सन १९९८ मध्ये तमाशा क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी महाराष्ट्रातील जत्रा, यात्रा, उत्सवानिमित्त विनोदी भूमिकेतून रसिकांच्या मनावर पंचवीस वर्षे अधिराज्य गाजवले आहे.विक्रम राजाची पुण्यानागरी अर्थात शनी महात्मे,पिसाटलेली वाघीण,महारथी कर्ण यासारखी अनेक पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक,धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावरील वगनाट्ये महाराष्ट्रभर गाजली आहे.

तमाशा क्षेत्रात लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य अविष्कार मुळे यांनी केले आहे.अविष्कार मुळे यांच्या तमाशा क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगांवकर जन्मगावी त्यांच्या स्मरणार्थ कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहु विचारमंचाच्या वतीने अविष्कार मुळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट पुरस्काराने गौरविण्यात आले.

तसेच कला सम्राज्ञी पवळा कलामंचाचे अध्यक्ष श्रीकांत ताबाजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी लोककलावंतांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत केले जाते. या वर्षी देवगड खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त जागरण गोंधळाच्या कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्राच्या महागायिका कोमलताई करण पाटोळे यांना राज्यस्तरीय लोककलावंत पुरस्कार,शाहीर नंदकुमार पाटोळे पावशीकर यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी माजी भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,सरपंच सुभाष गडाख,संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव, पोलिस पाटील मथाजी पावसे, शिवसेना(शिंदे) जिल्हाध्यक्ष मागासवार्ग सेल सोमनाथ भालेराव, देवगड खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त उत्तम जाधव, बाळासाहेब गडाख, पी. आय. नारायण पावसे,वृक्ष मित्र प्रा.गणपत पावसे, यात्रा कमिटी अध्यक्ष मच्छिंद्र गडाख,उद्योजिका नंदा विलास पवार,मायाताई बागुल,बाळासाहेब भालेराव,गणेश दवंगे, बाबासाहेब कदम,राजू दारोळे,अभिजित भालेराव,रोहिणी भालेराव,

विकास दारोळे व ग्रामस्थांसह मोठ्या प्रमाणात कलाप्रेमी नागरीक उपस्थित होते.

You cannot copy content of this page