Maharashtra247

राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात पुन्हा धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त अवैध ताडीविक्रेत्यांचे धाबे दणाणले

अहमदनगर (दि.२६ फेब्रुवारी):-राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त डॉ.श्री.विजय सुर्यवंशी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात हातभटटी दारु निर्मिती विक्री,अवैध ताडी, विनापरवाना हॉटेल ढाबे यांच्या विरुद्ध संयुक्त विशेष मोहीमे अंतर्गत हातभटटीमुक्त गांव मोहिम अधिक परिणामकारक करण्यांबाबत उत्पादन शुल्क विभागाला सूचना केल्या होत्या.

दिलेल्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यात दि.२८ फेब्रुवारी रोजी हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री,ताडी विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती.या मोहिमेत जामखेड कर्जत श्रीगोंदा एमआयडीसी परिसर राहता संगमनेर राहुरी श्रीरामपूर पाथर्डी येथे धडक कारवाया करण्यात आल्या.या कारवाईत १६ जणांना अटक केली असून ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हि कारवाई महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ.श्री.विजय सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार श्री.प्रसाद सुर्वे संचालक (अं व द), राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य, मुंबई,श्री.सागर धोमकर, विभागीय उपआयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,पुणे विभाग, तसेच श्री.प्रमोद सोनोने,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,अहमदनगर श्री.प्रवीणकूमार तेली, परि.उपअधीक्षक राज्यउत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे सर्व कार्यकारी निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, तसेच भरारी पथक क्र.१ अहमदनगर व २ श्रीरामपूर तसेच अकार्यकारी घटकाचे निरीक्षक/दुय्यम निरीक्षक, जवान कर्मचारी यांनी केली आहे.

परि.उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर प्रवीणकुमार तेली यांनी जनतेस केले हे आवाहन

आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात अवैध मद्यविक्रीहोत असल्याचे निदर्शनास आल्यास विभागाचे खालील नमुद क्रमांकावर तक्रार करावी.जेणे करुन अवैध मद्यविक्री/ निर्मिती व वाहतुक इ.परिणामकारक कारवाई होऊन त्याचेसमूळ उच्चाटन होण्यास जनतेद्बारे मदत होईल.

टोल फ्री क्र:-१८००२३३९९९९

व्हाट्सअप क्रमांक:-८४२२००११३३

दूरध्वनी क्रमांक:-०२४१२४७०८६०

You cannot copy content of this page