महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालकपदी श्रीनिवास सब्बन यांची नियुक्ती
अहमदनगर (दि.२९ फेबुवारी):-अहमदनगर शहरातील श्रमिक नगर येथील रहिवासी तसेच पद्मशाली समाजातील श्रीनिवास सब्बन यांची महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालकपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातून हालाखीची परिस्थिती असताना मनात जिद्द ठेवून श्रीनिवास यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपले ध्येय गाठले आहे.वडील मोलमजुरी व आई विडी कामगार असून त्यांनी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा पाठिंबा दिला असल्याचे यावेळेस श्रीनीवास यांनी सांगितले.त्यांनी श्रमिक नगर मधील श्री मार्कंडेय विद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यांच्या निवडीने विद्यालयाचे नावही उंचावले आहे.त्यांच्या या निवडीने श्रमिक नगर परिसरात समाजात व तसेच नगर शहरात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.