ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग येऊन तरुणाच्या डोक्याला लावले पिस्तूल
संगमनेर प्रतिनिधी (दि.१.जानेवारी):- ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग आल्याने तरुणाच्या डोक्याला बंदूक लावून,तोंडात औषध टाकून दोन वाहनांमधून आलेल्या गुंडांनी जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दि.३० रोजी घडली आहे.याप्रकरणी घारगाव पोलिसांत १६ जणांसह इतर १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.सुनील नामदेव इघे (वय ३९) असे मारहाण झालेल्याचे नाव असून,सुजित अशोक खेमनर, अनमोल शंकर खेमनर, आबा वाकचौरे,बाजीराव सतू खेमनर,संतोष धोंडीभाऊ खेमनर,उमेश अशोक गाडेकर,गणपत बाळासाहेब पवार,किशोर बापू गाडेकर, रफिक सिकंदर चौगुले, भगवान सुभाष शेंडगे,लखन सुभाष शेंडगे,बालम सुलेमान पटेल,दत्तात्रय सुभाष रेणुकादास,फिरोज सरदार पटेल,सुधीर सयाजी फटांगरे, कल्पेश गडगे (सर्व रा. साकुर, ता.संगमनेर) यांच्यासह इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे.साकुर ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या ग्रामसभेस जोगेपठार येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नसल्याबाबत सुनील इघे यांनी ग्रामसेवकाला प्रश्न केला होता.यावर ‘तुझा येथे बोलण्याचा काहीएक संबंध नाही,तू खाली बस’, असे शंकर खेमनर म्हणाले. त्यामुळे इघे यांनी त्यांना समजावून सांगत माझा वैयक्तिक प्रश्न नाही,तो जनतेचा हक्क असल्याचे सांगितले.त्याचा राग येऊन शंकर खेमनर, इंद्रजित खेमनर, अनमोल खेमनर, हर्षद खेमनर,रफिक चौगुले, आबा वाकचौरे,गणपत पवार आणि ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी इघे यांना शिवीगाळ,दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ‘आमच्याविरुद्ध आवाज उठवला, तर तुला कायमचा संपवून टाकीन.आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्यावर आम्ही गुन्हा दाख करू,’ अशी धमकी दिली.याबाबत सुनील इघे यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली.घारगाव पोलिसांनी या बाबत गुन्हा देखील दाखल केला होता.