नगर प्रतिनिधी (दि.१.जानेवारी):-नगर शहरातील कल्याण रोड, (कोतवाली) पावबाकी, सुकेवाडी,संगमनेर येथील घरात प्रवेश करुन,चाकुचा धाक दाखवुन दरोडा चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री.यश उमेश शेळके (वय 22,रा.प्लॉट नं.148, विद्या कॉलनी,नगर कल्याणरोड,अहमदनगर) यांचे तसेच त्यांचे शेजारी राहणारे तीन साक्षीदार यांचे घरी अनोळखी 6-7 इसमांनी घराचे दरवाजाचाचा कडीकोंडा कटावणीने तोडुन आत प्रवेश केला व सामानाची उचकापाचक करुन चाकुचा धाक दाखवुन 4,30,500/- रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम एसबीआय व आयसीआयसी बॅकेचे एटीएमकार्ड दरोडा चोरी करुन चोरुन नेले होते.सदर घटने बाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं.1053/2022 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरची घटना घडल्यानंतर श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी घटना ठिकाणी भेट देवुन,निरीक्षण करुन पोनि/श्री.अनिल कटके,स्थागुशा यांना स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.स्थागुशा विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार नगर तालुका परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे प्रशांत ऊर्फ धोळ्या चव्हाण (रा.सालेवडगांव रोड, चिचोंडी पाटील,ता.नगर) याने त्याचे 5 ते 6 साथीदारासह वर नमुद गुन्हा केला असुन ते सर्व चिचोंडी पाटील शिवारातील सालेवडगांव रोडवरील माळरानावर लपुन बसलेले आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर मिळाल्याने पोनि/कटके यांनी प्राप्त माहिती विशेष पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथकास लागलीच सालेवडगांव रोड,ता.नगर येथे रवाना केले.विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करुन सालेवडगांव येथे जावुन माळरानाची पहाणी करता त्यांना 6-7 इसम एका लिंबाचे झाडा खाली बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते माळरानावर पळु लागले. पथकाने लागलीच पाठलाग करुन दोन संशयीतांना ताब्यात घेतले व त्यांचे इतर साथीदार डोंगरातील झाडा झुडपांचा सहारा घेवुन पळुन गेले त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. ताब्यात घेतलेल्या दोन्ही इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) रावन ऊर्फ छनक नादर चव्हण,वय 23 व 2) फिलीप नादर चव्हाण,वय 23 दोन्ही रा.सालेवडगांव रोड,चिचोंडी पाटील,ता.नगर, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपींना विश्वासात घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे दरोडा चोरी केली आहे या बाबत विचारपुस केली असता आरोपींनी पावबाकी, सुकेवाडी,ता.संगमनेर येथे घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवुन चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1063/2022 भादविक 395 प्रमाणे दरोडा चोरीचा गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने दोन्ही आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा व गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -03 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1) नगर तालुका 123/2011 भादविक 324, 323, 504, 506, 143, 147
2.)कोतवाली 1053/2022 भादविक 395
3.)संगमनेर शहर 1063/2022 भादविक 395
आरोपी नामे फिलीप नादर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात दरोडा व घरफोडी करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -04 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1)नगर तालुका 433/2011 भादविक 395, 427
2)अंभोरा जिल्हा बीड 154/2011 भादविक 457, 380
3) कोतवाली 1053/2022 भादविक 395
4)संगमनेर शहर 1063/2022 भादविक 395
सदरची कारवाई श्री.राकेश ओलापोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.अजित पाटील उविपोअ,नगर ग्रामिण विभाग,श्री.संजय सातव उविपोअ,शिर्डी विभाग, अतिरिक्त प्रभार संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/दिनकर मुंडे,सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे,संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,फकिर शेख,देवेंद्र शेलार,विश्वास बेरड,पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी,संदीप दरदंले, सचिन आडबल,भिमराज खर्से,दिपक शिंदे,पोकॉ/जालिंदर माने,विनोद मासाळकर,आकाश काळे, रणजीत जाधव,योगेश सातपुते,मेघराज कोल्हे, मपोकॉ/सारीका दरेकर, चापोहेकॉ/बबन बेरड, संभाजी कोतकर,अर्जुन बडे व भरत बुधवंत यांनी केली आहे.