Maharashtra247

पाच गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात फरार आरोपी  सोनई पोलिसांकडून जेरबंद

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१.जानेवारी):-खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार कुख्यात आरोपी जेरबंद करण्यात सोनई पोलीस स्टेशनला यश आले आहे.श्री. राकेश ओला पोलिस अधीक्षक यांनी पाहीजे व फरार आरोपी शोध मोहीमेबाबत आदेशित केले असल्याने पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेत असताना सोनई पोलीस स्टेशनचे सपोनि/श्री माणिक चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,खुन व बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे रविंद्र फुलचंद भोसले हा मोरया चिंचोरे गावाकडे येत आहे.अशी बातमी मिळताच सोनई पो.स्टेचे पोसई/राजु थोरात,पोहेकॉ/गावडे,पोकॉ/थोरात पोकॉ/पालवे,पोकॉ/आघाव यांचे पथकांस रवाना केले.असता मोरया चिंचोरे येथे आरोपीस पोलीसांची चाहुल लागल्याने त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला शिताफिने पथकांने ताब्यात घेतले.सदर आरोपी हा खालील गुन्ह्यांमध्ये सन 2020 पासून फरार होता.

1) सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 14/2020 भा.द.वि. कलम 376 (2) (आय) (एन),506, 34 सह पोक्सो कायदा कलम 6.10.12 प्रमाणे ( फरार )

2) शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 55/2022 भा.द.वि. कलम 302 (फरार)

3) सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 34/2020 भा.द.वि कलम 324 ( फरार )

त्याचे विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहीती खालीलप्रमाणे

4) सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजि 80/2018भा. द. वि. कलम 399,402

5) सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 22/2014 भा.द.वि. कलम 354 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपी यास सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 14/2020 भा.द.वि. फलम 376 (2)

(आय) (एन), 506, 34 सह पोक्सो कायदा कलम 6.10.12 या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून

पुढील तपास पोसई/थोरात हे करीत आहे.सदरची कामगीरी श्री.राकेश ओला जिल्हा पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधिक्षक श्रीमती/ स्वाती भोर मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री/संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक/माणिक चौधरी व अंमलदार यांनी केली आहे.

You cannot copy content of this page