
अहमदनगर (दि.६ मार्च):-भिंगार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना गोपनिय माहिती मिळाली की,एसबीआय चौकातील हॉटेल साई श्रध्दाच्या आडोशाला एक इसम हा विनापरवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत आहे.
अशी माहिती मिळाल्याने कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोथ पथकातील अंमलदारांनी बातमीतील नमुद ठिकाणी छापा टाकुन एका इसमास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्यानेत्याचे नाव एहसान नसिर खान (रा.दलाल वस्ती पश्चिम बंगाल) असे सांगुन त्याचे कब्जात 7880/- रु.किंमतीच्या देशी व विदेशी दारु मिळन आल्याने त्या जप्त करण्यात आल्या असुन त्या इसमाच्या विरुधुद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन दुस-या ठिकाणी बु-हाणनगर येथील पोस्टमन कॉलनी येथे एक इसम हा गावठी हातभटटीची तयार दारू विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने कॅम्प पोलीसस् टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी बातमीतील नमुद ठिकाणी छापा टाकला असता तेथे एक इसम हागावठी हातभटटीची तयार दारुची विक्री करत असतांना पथकातील अंमलदारांना दिसून आल्याने त्यास जागीच पकड़न त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अविनाश बबन उमाप (रा.राजवाडा पोस्टमन कॉलनी बु-हाणनगर अहमदनगर) असे असल्याचे सांगुन त्याचे कब्जात एकुन 3000/-किंमतीची गावठी हातभटटीची दारु मिळन आली त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास भिंगार पोलीस करत आहेत.
हि कारवाई मा.पोलीस अधिक्षक जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खेरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनी/ योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/संदिप घोड़के,पोहेकॉ/दिपक शिंदे, पोहेकॉ/गणेश साठे,पोहेकॉ/ रघुनाथ कुलांगे,पोकॉ/अमोल आव्हाड,पोकॉ/समिर शेख, मपोकॉ/साळवे यांनी केली आहे.