
अहमदनगर (दि.७ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने कारवाई करत महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोमास मुद्देमालासह जप्त केले आहे.हि ही कारवाई ५ मार्च रोजी गुन्हे शोध पथकाने केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमास विक्री व वाहतुकीची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.दिलेल्या आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांना संगमनेर परिसरात पेट्रोलिंग करुन गोमास विक्री करणारे इसमांची माहिती घेवुन मिळुन आल्यास कारवाई करण्याच्या सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथक गोमास विक्री करणा-या इसमांची माहिती घेत असताना इसम नामे अनिस कुरेशी (रा.संगमनेर) हा भारतनगर,ता.संगमनेर हा निळ्या रंगाचे पत्र्याचे गेट असलेले घरात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश जनावरांची कत्तल करतो आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी भारतनगर,संगमनेर येथे एका निळ्या रंगाचे पत्र्याचे गेट असलेले घरात जावुन खात्री केली असता एक इसम घरात गोवंश जातीचे जनावराची कत्तल करताना दिसुन आला.
त्यास जागीच पकडुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अनिस गुलाम हैदर कुरेशी (रा.वॉर्ड नं.2 भारतनगर,ता. संगमनेर मुळ रा.राजवाडा जवळ,ता.संगमनेर) असे सांगितले.ताब्यातील आरोपीचे कब्जातुन 850 किलो गोमास व तुकडे,1 सुरा व 1 कु-हाड असा एकुण 1,70,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द संगमनेर शहर पो.स्टे.गु.र.नं. 199/2024 भादविक 269, 429 सह मपसंकाक 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे.हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुकर्मे साहेब अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री. सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सचिन आडबल,संतोष खैरे,अमृत आढाव व आकाश काळे यांनी केली आहे.