संगमनेर प्रतिनिधी (दि.२.डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निमोण येथे १४ लाख १७ हजार ४१६ रुपयांचे आरमार्ड केबलचे बंडल सोमवारी दि.2 जानेवारी मध्यरात्री चोरुन नेले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.निमोण येथील संदीप भास्कर देशमुख यांच्या घरासमोरून स्कॉर्पिओ वाहनातून अक्षय संजय जाधव (वय२४,बालमटाकळी, ता.शेवगाव.जि.अहमदनगर) व त्याच्या इतर दोन साथीदारांनी आरमार्ड केबलचे बंडल चोरुन नेले.याप्रकरणी संदीप भास्कर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांवर पोलिसांनी भादंविक ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक विजय खंडीझोड हे करत आहे.
