दि.२.जानेवारी:- प्रतिनिधी/अजित चव्हाण
कळंब:- स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे आयोजित मराठवाडा विभाग शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व मराठवाडा भूषण 2023 आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण कार्यक्रम तुळजापूर येथील पंचायत समिती परिसरात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील,सन अँड ओशन ग्रुपचे चेअरमन राजकुमार धुरगुडे,जयंती महोत्सव समिती अध्यक्ष महेंद्र धुरगुडे, मराठवाडा समन्वय समिती सहसचिव सुभाष गायकवाड, शैलेश धुरगुडे आदींची उपस्थिती होती.यावेळी मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब येथील विशेष शिक्षक, कवी, लेखक, पत्रकार आश्रुबा अंकुशराव कोठावळे राहणार कोठाळवाडी यांचा सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला.तुळजाई प्रतिष्ठान संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील विशेष शिक्षक आश्रुबा अंकुशराव कोठावळे गेल्या 18 वर्षापासून अविरतपणे मूकबधिर विद्यार्थ्यांना अध्यापन कार्य करत आहेत. त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या अनेक कथा, कविता वर्तमानपत्रातून दिवाळी अंकातून प्रकाशित होत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत असते तसेच विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागावा या साठी त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत असते.या सर्व शैक्षणिक व साहित्यिक व आणि सामाजिक कार्यामध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून हा मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक जाधवर व दिपक शेळके तसेच मित्रपरिवार व शहरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
