संगमनेर (राजेंद्र मेढे):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोला मंगळवार दि.१२ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.यामुळे धुराचे लोट हवेत पसरले होते.
त्यामुळे वाहनचालकांची चांगलीस कसरत झाली.याची माहिती मिळताच मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पालिकेचा संगमनेर खुर्द येथे कचरा डेपो आहे.येथे नियमित संकलित होणारा कचरा आणला जातो.शिवाय त्यावर प्रक्रिया देखील केली जाते. दरम्यान,मंगळवारी सायंकाळच्या वेळी अचानक आग लागल्याने पालिका प्रशासनाची पळापळ झाली.
मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी तत्काळ अग्निशमन बंबांना पाचारण केले.तसेच कर्मचारी देखील आग विझवण्यासाठी उपस्थित होते.आगीमुळे ज्वाला व धुराचे लोट हवेत पसरल्याचे दिसत होते.मात्र,ही आग कशाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.