अहमदनगर (दि.१३ मार्च):-शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथे गोरक्षकावर खुनी हल्ला करणारे दोघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि.११ मार्च रोजी घटनेतील फिर्यादी श्री.रविंद्र भिमा गायकवाड (रा. नाथनगर,पाथर्डी,ता.पाथर्डी, जि.अहमदनगर) हे तसेच त्यांचे सोबत इतर गोरक्षक यांना अमरापुर येथील कुरेशी मोहल्ला येथे गोवंशीय जनावरांची कत्तल होत असलेबाबत माहिती मिळाल्याने कुरेशी मोहल्ला येथे गेले असता आरोपी नामे राजु कुरेशी व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉड,लोखंडी सत्तुरने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.या घटनेबाबत शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 215/2024 भादवि कलम 307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
घटना ही हिंदु व मुस्लीम समाजामध्ये घडलेली असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले होते.आदेशानुसार पोनि.श्री/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन आरोपींची माहिती काढुन आरोपी अटक करणेबाबत सुचना देवुन पथकास सुचना देवुन रवाना केले होते.पोलीस पथक शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना पोनि.श्री.आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी अलताब सय्यद व त्याचा एक साथीदार हे अमरापुर गावामधुन कोठेतरी पळुन जाण्याचे तयारीत स्टँडवर उभे असल्याची माहिती मिळाल्याने पोनि.आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.
पथकाने तात्काळ अमरापुर गावातील स्टँडवर जावुन खात्री करता सदर ठिकाणी दोन इसम संशयीतरित्या रोडचे कडेला वाहनाची वाट बघतांना दिसुन आले.त्यावेळी पथकास सदर दोन्ही इसमांचा संशय आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1)अल्तमश बशीर शेख रा.अमरापुर,ता.शेवगांव, जि. अहमदनगर, 2)अलताब तैय्यब शेख रा.अमरापुर,ता. शेवगांव,जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 215/2024 भादवि कलम 307 वगैरे या गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे,पोलीस अंमलदार संतोष लोढे,गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले, फुरकान शेख,रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे,संदीप चव्हाण,किशोर शिरसाठ, आकाश काळे,बाळासाहेब गुंजाळ,उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांनी केली आहे.