अहमदनगरचे नाव आत्ता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
प्रतिनिधी (दि.१३ मार्च):- अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा,त्यांचे विचार,कार्य,व स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे.अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.तसेच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व्हावे ही आग्रही मागणी होती.ती आज पूर्णत्वास आली.त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता.