अहमदनगर (दि.१३ मार्च):-नगर तालुक्यातील निंबळक परिसरात चारचाकी वाहनातून हातभट्टी दारू वाहतुक करताना चार चाकी वाहनासह तब्बल १४० लि. हातभट्टी दारू असा एकूण १०,१५०० रू.मुद्देमाल जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केले आहे.
हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त पुणे श्री. सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक अहमदनगर श्री. प्रमोद सोनोने यांच्या सूचनेनुसार श्री.प्रवीण कुमार तेली परि.उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नगर श्री.सुरज कुसळे भरारी पथक क्रमांक १,श्री.आनंद जावळे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १,श्री.विनोद रानमळकर स.दुय्यम निरीक्षक,जवान श्री.प्रवीण साळवे,श्री.देवदत्त कदरे,श्री. अविनाश कांबळे, महिला जवान श्रीमती.एस.आर.आठरे यांनी बुधवार ता.१३ मार्च २०२४ रोजी केली आहे.तसेच अवैधरित्या हॉटेलवर दारू विक्री केल्यास किंवा आढळून आल्यास कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरज कुसळे यांनी यावेळी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर निरीक्षक श्री.सुरज कुसळे यांचे जनतेस आवाहन
आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास विभागाचे खालील नमूद क्रमांकावर तक्रार करावी, जेणेकरून अवैध मद्यविक्री/ निर्मिती व वाहतूक इ. परिणामकारक कारवाई होऊन त्याचे समूळ उच्चाटन होण्यास जनतेद्वारे मदत होईल.
1) टोल फ्री क्रमांक 18002339999
2) व्हाट्सअप क्रमांक 8422001133
3) दूरध्वनी क्रमांक 0241-2470860