
अहमदनगर (दि.१५ मार्च):-कोयत्याचा धाक दाखवून शहरात गुन्हे करणाऱ्या विधीसंघर्षीत बालकाकडून चोरी केलेले मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकीकत अशीकी,दि.१५ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात मोपेड गाडीवरुन संशयीत रित्या दोन मुल फिरताना दिसल्याने कोतवाली पोलिसांनी मोपेड गाडीवरील मुलांना हटकले असता त्यातील एक मुलगा अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला.
उर्वरीत एका मुलास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता तो विधीसंघर्षीत बालक असल्याचे दिसुन आले.त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक होंडा अॅक्टीवा कंपनीची बिगर नंबरची मोपेड,एक काळे रंगाचा त्यावर प्लॅस्टीक मुठ असलेला लोखंडी धारदार हत्यार लोखंडी कोयता,एक काळ्या रंगाचा त्यावर प्लॅस्टीक कव्हर असलेला ओपो CPH 2591 मोबाईल फोन,एक रंगबिरंगी कव्हर असलेला रिअलमी कंपनीचा ८ आय मॉडेलचा मोबाईल फोन असे मिळुन आले.
त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 332/2024 शस्र अधिनियम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे.या विधीसंघर्षीत बालकाकडे गुन्ह्याचे अनुशंगाने अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचा जोडीदारासह रात्रीच्या वेळी शहरात फिरुन एकट्या दिसणारे इसमांना टार्गेट करुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे कडील मोबाईल,रोख रक्कम चोरी करित असल्याचे तसेच चोरी केलेले मोबाईल त्याचा मित्र अभिषेक केशव पवळ (रा. गांधीमैदान,अहमदनगर) यास विक्री करण्याकरिता देत असल्याचे सांगितले.गुन्ह्यात एकुन ६ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार सपोनिरी.योगीता कोकाटे,पोहेकॉ/तनवीर शेख,पोहेकॉ/शाहीद शेख,पोना/अविनाश वाकचौरे,पोकॉ/दिपक रोहोकले,सत्यजित शिंदे,तानाजी पवार,प्रमोद लहारे,अतुल काजळे,सुरज कदम,सोमनाथ केकान,शिवाजी मोरे,महेश पवार,अभय कदम,अमोल गाडे,सुजय हिवाळे,होमगार्ड चंद्रकांत सोनवने यांनी केली आहे.