
अहमदनगर (दि.२१ मार्च):-सराईत गुन्हेगारांकडुन ४ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणून ८१ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी सौ.सुवर्णा शाम मिसाळ (रा.सोनार गल्ली, लोणी बु,ता.राहाता) या रस्त्याने पायी घरी जाताना पाठीमागुन काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी २ इसमा पैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील १ लाख ५०,०००/-रुपये किंमतीचे २६ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र ओढून तोडून बळजबरीने चोरुन नेले बाबत लोणी पो.स्टे येथे गु.र.नं. ७०/२०२४ भादविक ३९२,३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हेचे पथक नेमुन ना उघड चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन ना उघड चैन स्नॅचिंग गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
स्थागुशा पथकाने कोपरगांव,शिर्डी,राहाता व लोणी परिसरातील चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्यामधील आरोपींचे वर्णन व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल याच्या आधारे तपास करुन मोटार सायकलवरील इसमापैकी एक संशयीत इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कु-हाडे (रा.चितळी स्टेशन,ता.राहाता) हा असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्यास चितळी,ता. राहाता येथुन ताब्यात घेतले व त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर साथीदार नामे राहुल कु-हाडे व सचिन कु-हाडे दोन्ही रा. चितळी स्टेशन,ता.राहाता यांचे सोबत लोणी,राहाता व शिर्डी परिसरातुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असुन चोरी केलेले सोने साथीदार नामे सचिन कु-हाडे याचे कडे ठेवले आहे असे सांगितले.
स्थागुशा पथकाने लागलीच आरोपी नामे राहुल कु-हाडे व सचिन कु-हाडे यांचा चितळी स्टेशन, ता.राहाता परिसरात शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत एका पिशवीत सोन्याचे दागिने मिळुन आले.त्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोने असल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.आरोपींनी दिलेल्या माहितीचे अनुषंगाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता खालील चैन स्नॅचिंगचे एकुण ४ गुन्हे उघडकिस आले.ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 1,56,000/- रुपये किंमतीचे 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 1,50,000/- रुपये किंमतीचे 25 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, 60,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, 1,20,000/- रुपये किंमतचे 20 ग्रॅम वजनाचे गंठण व 75,000/- रुपये किंमतीची काळे रंगाची सुपर स्प्लेंडर असा एकुण 5,61,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 70/24 भादविक 392, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,अंमलदार दत्तात्रय हिंगडे,रविंद्र कर्डीले,मनोहर गोसावी,संदीप पवार,अतुल लोटके,देवेंद्र शेलार,भिमराज खर्से,फुरकान शेख,अमृत आढाव व मेघराज कोल्हे यांनी केली आहे.