अहिल्यानगर (अहमदनगर २९ मार्च):-शिर्डी लक्झरी बस लुट प्रकरणातील तब्बल ९ वर्षापासुन फरार असलेला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने अटक केली आहे.बातमीची हकिगत अशी की, घटनेतील फिर्यादी श्री. रमेशभाई भाईचंद पटेल (रा. नवाधर कोसा,ता.विसनगर, जिल्हा मेहसाना,गुजरात हल्ली रा.सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली,अहमदनगर) हे अहमदनगर येथुन लक्झरी बसणे सुरत,गुजरात येथे जाताना शिर्डी येथील खंडोबा मंदीरा समोर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी करुन तुम्ही चोरी करुन आले असुन पोलीस स्टेशनला चला असे म्हणुन लक्झरी बसमधुन खाली उतरवुन तवेरा गाडीत बसवले व फिर्यादी जवळील 5,00,000/- रुपये रोख रक्कम बळजबरीने काढुन घेवून गेले व फिर्यादीस कोपरगांव येथे सोडून निघुन गेले बाबत शिर्डी पो.स्टे. येथेगु.र.नं.138/2015 भादविक 395,363,170, 34 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचे तपासात तात्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करुन एकूण ६ आरोपी निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकिस आणला होता.परंतु यातील आरोपी नामे मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्याप पर्यंत फरार होता.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पथकास वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा.केडगांव, अहमदनगर) याची माहिती काढत असताना तो गोंदीया, नागपुर व झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलुन, ओळख लपवुन राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
हा आरोपी कात्रड,वांबोरी,ता.राहुरी येथे त्याचे नातेवाईकांकडे येणार आहे.अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने लागलीच कात्रड,वांबोरी,ता.राहुरी येथे जावुन फरार आरोपीचे नातेवाईकाचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन नातेवाईकांचे घराचे आजु बाजूला सापळा रचुन थांबलेले असताना त्या ठिकाणी एक तोंड बांधलेला इसम संशयीतरित्या घरामध्ये गेल्याचे दिसुन आल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन संशयीतास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा.एकनाथ नगर,केडगांव,नगर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता आरोपीने सन 2015 मध्ये रमेश भाईचंद पटेल हे हवालाची 5 लाख रुपये रोख रक्कम अहमदनगर येथुन लक्झरी बसणे सुरत,गुजरात येथे जाणार असल्याने त्यांचे लक्झरी बसचा अहमदनगर येथुन तवेरा गाडीतुन पाठलाग करुन त्यांना शिर्डीत लुटल्याचे सांगितले.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार सफौ/राजेंद्र वाघ, रविंद्र कर्डीले,विशाल दळवी, देवेंद्र शेलार,मयुर गायकवाड,उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.