
अहमदनगर (प्रतिनिधी):-डॉ.विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविदयालयाच्या वतीने क्षयरोग प्रतिबंधक मोहिम राबविण्यात आली.क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर क्षयरोग आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी रेली काढून मेळावा घेण्यात आला.क्षयरोग ही गंभीर समस्या निर्माण होत असताना क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी वडगाव गुप्ता येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्रात याउपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी विद्यार्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करुन माहिती दिली.या मोहिमेत वडगाव गुप्ता गावचे सरपंच विजय शेवाळे,ग्रामसेवक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.महाविदयालयाचे प्राध्यापक निलेश म्हस्के यांनी क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शन केले.आधुनिक वैद्यकिय शास्त्रातील निदान व उपचारामुळेआज क्षयरोग पुर्णतःबरा होतो.15 ते 55 वर्ष या वयोगटातील व्यक्तीना हा आजार होतो.या आजाराने ग्रासलेले रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षण हे महत्त्वाचीभूमिका बजावू शकतात.
क्षयरोगाचा संसर्ग दुसच्यानिरोगी व्यक्ीस होऊ नये,याची खबरदारी घेणेप्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रतिभा चांदेकर, उपप्राचार्य डॉ.योगिता औताडे,प्राध्यापक अमोल टेमकर,निलेश म्हस्के,प्रमोद सुर्यवंशी,पूजा मोरे,वर्षा शिंदे, पल्लवी कोळपकर यांनी परिश्रम घेतले.