अहमदनगर (१ एप्रिल):-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमूद दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे कोपरगांव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि/हेमंत थोरात यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे प्रदीप बाजीराव पायमोडे (रा.मंजुर,ता.कोपरगांव) हा त्याच्या कब्जात गांजा बाळगुन राहते घरी विक्री करतो अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली.त्यानंतर पथकाने तात्काळ कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे जावुन पोनि/संदीप कोळी व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन केले.
पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी मंजुर,ता. कोपरगांव येथे जावुन संशयीत नामे प्रदीप पायमोडे याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन,त्याचे राहते घरा समोर जावुन खात्री केली असता घरात एक इसम लोखंडी कॉटवर बसलेला दिसला.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदीप बाजीराव पायमोडे रा.मंजुर,ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितले.
त्याच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे घरातील कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळुन आला.पथकाने पिवळ्या रंगाच्या गोणीत मिळुन आलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला या बाबत विचारणा करता त्याने पिवळ्य रंगाच्या गोणीत बिया बोंडे,काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा असुन विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने पिवळ्या रंगाच्या गोणीत ठेवलेला 1,06,150/- रुपये किंमतीचा 10 किलो 732 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने तो हस्तगत करुन या बाबत आरोपी विरुध्द पोकॉ/176 बाळासाहेब अशोक गुंजाळ ने.स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 115/2024 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगांव तालुका पो.स्टे. हे करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात व अंमलदार बाळासाहेब मुळीक,संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ,उमाकांत गावडे व मपोकॉ/प्रियंका चेमटे यांनी केलेली आहे.