संगमनेर प्रतिनिधी (नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील पाट कालव्या लगत डॉ.संदीप पावसे यांच्या घराजवळ असलेला ट्रान्सफार्मर ओव्हर लोडमुळे जळाला.सदर ट्रान्सफार्मर वरून हाडवळे वस्ती,बिवडा वस्तीसह कृषी पंपधारकांना वीज पुरवठा केला जातो. उन्हाचा कहर,दुष्काळाची वाढती दाहकता,वातावरणातील बदल,कमी पाणी,कमी क्षमतेने होणारा वीज पुरवठा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असताना,हा ट्रान्सफार्मर नादुरुस्त होऊन जळाला.
मात्र महावितरणचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक अभियंता बेदरकर यांच्या कार्यतत्परतेमुळे ट्रान्सफार्मर तातडीने उपलब्ध करून देण्यात आला.यावेळी सामाजिक बांधिलकी जपत मा.फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच संस्थेने पुढाकार घेतला.त्रस्त शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर तातडीने उपलब्ध करणे कमी महत्वाची भूमिका पार पाडली.ट्रान्सफार्मर जाळल्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव याची भेट घेतली.मा.फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंचा मार्फत सहाय्यक अभियंता यांना माहिती दिली.
हिवरगाव पावसा येथील सब स्टेशनचे सहाय्यक अभियंता बेदरकर यांनी वरिष्ठ अधिकार्यांना संपर्क साधला.बाभळेश्वर येथून ट्रान्सफार्मर तातडीने उपलब्ध करण्यात आला.तो ट्रान्सफार्मर महावितरण कर्मचार्यांनी व्यवस्थितरित्या बसविला.हिवरगाव पावसा येथील पाट कालव्या लगत डॉ.संदीप पावसे यांच्या घराजवळ असलेल्या ट्रान्सफार्मर वरून हाडवळे वस्ती, बिवडा वस्तीसह कृषी पंपधारकांना वीज पुरवठा केला जातो. ट्रान्सफार्मर जळाला की, शेतकऱ्यांचे शेती,जनावरांच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होतात.अस्मानी व सुलतानी संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला मा.फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी
शाहू विचारमंच हि संस्था धावून आली.तसचे सहाय्यक अभियंता बेदरकर हे कार्यालयीन जबाबदारी बरोबर,त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षपणा कार्यतत्परतेची हिवरगाव पावसा पंचक्रोशीत व संगमनेर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ट्रान्सफार्मर तातडीने उपलब्ध करणे कमी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव, सहाय्यक अभियंता बेदरकर यांच्या सह महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी दिली.